ग. के. केळकर - लेख सूची

चर्चा – पंतप्रधान कोणी व्हावे?

संपादक, आजचा सुधारक यांस, जून ९९ च्या अंक वाचला. यावेळी नेहमीची तर्कसंगती व विचारांची सुसूत्रता त्यात जाणवली नाही. म्हणून त्याविषयी काही विचार मांडीत आहे. १) भारतातील सुशिक्षित व अशिक्षित असे दोन्ही प्रकारचे मतदार लोकशाही प्रक्रियेस कसे अयोग्य आहेत यावर दोन परिच्छेद लिहिल्यावर पुढे एके ठिकाणी आपण म्हणता की पंतप्रधान कोणी व्हावे हा जनतेचा प्रश्न नसून …

ऊर्जेचे नियमन

ऊर्जा म्हणजे निसर्गातल्या शक्तीचेच एक रूप आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. उष्णता, वीज, पाण्याचा साठा हे ऊर्जेचे अविष्कार आहेत. ऊर्जेचा संचय (concentration) जर प्रमाणाबाहेर होऊ लागला तर ती विध्वंसक आणि प्रलयकारी होऊ शकते. त्यासाठी तिचे विरेचन किंवा नियमन होणे आवश्यक असते. उष्णता प्रमाणाबाहेर वाढली तर तिच्या भक्ष्यस्थानी काय काय पडेल ते सांगता येत …